दांडिया नीट खेळण्यास सांगितल्याने खराळवाडीत अल्पवयीन मुलाला जिवघेणी मारहाण, चौघांना अटक

0
1519

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – दांडिया लागला असता पुढच्याला दांडिया नीट खेळण्यास सांगितल्याचा राग आल्याने टोळक्याने तरुणाला कोयता व स्टील पाईपने जीवघेणी मारहाण केली आहे. हि घटना सोमवारी (दि.23) पिंपरी येथे घडली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष थोरात (वय 21), आकाश थोरात (वय 22), आदित्य मंगळवेडेकर (वय 21), नितीन शिंगाडे (वय 40) सर्व रा. खराळवाडी, पिंपरी यांना अटक केली असून त्यांचा साथीदार क्रीश शिंगाडे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दांडिया खेळत असताना संतोष याच्याकडून फिर्यादीला दांडिया लागला. यावेळी दांडिया नीट खेळ असे सांगितले असता संतोष ला त्याचा राग आला. त्याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून त्याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच स्टीलच्या पाईपने डोक्यात मारले. यावेळी फिर्यादीचा मावस भाऊ हा वाचवण्यासाठी मध्ये पडला असता आरोपींनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.यावरून पिंपरी पोलिसांनी चौघांना अटक केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.