दहीहंडी बघायला गेलेल्या तरुणाची सोनसाखळी हिसकावली

0
372

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरी मधील राजमाता उड्डाणपुलासमोर आयोजित केलेला दहिहंडी उत्सव पहायला गेलेल्या तरुणाची चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावली. ही घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री नऊ वाजता घडली.

गौरव ज्ञानदेव काकडे (वय 20, रा. वल्लभनगर, पिंपरी. मूळ रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील राजमाता उड्डाणपुलाजवळ आयोजित केलेला दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी फिर्यादी शुक्रवारी रात्री गेले होते. दहिहंडीच्या गर्दीत नाचणाऱ्या दोन चोरांनी ढकलाढकली करत त्यांच्या गळ्यातील 9.200 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.