दहा वर्षांपासून फरार असलेल्या सख्या भावांना अटक

0
498

वाकड, दि. १७ (पीसीबी) – सन 2014 साली खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या दोघा सख्या भावांना खंडणी विरोधी पथकाने वाकड मधून अटक केली.

विकी सुरेंद्र सहानी (वय 29, रा. पिंपळे सौदागर), राजन सुरेंद्र सहानी (वय 40, रा. औंधगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2014 साली वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात सहानी बांधव फरार होते. गुन्हा केल्यानंतर ते दोघे पळून गेले होते. पिंपरी चिंचवड पोलीस दोघा भावांचा शोध घेत होते. दरम्यान, दहा वर्षानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, हे दोघे भाऊ वाकड पोलीस ठाण्याजवळ दत्त मंदिर रोड येथे पेंटिंगचे काम करत आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. पुढील कारवाईसाठी दोघांना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.