दि.1 (पीसीबी) – संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, आमच्या मंत्र्यावर आरोप झाला होता तेव्हा आम्ही त्याला मंत्रिमंडळातून दिले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वेगळे नसून एकच आहेत.
आमच्या चित्राताई बोलल्या, पूजा चव्हाणचा खून केला गेला आम्ही वेळ घालवला नाही. काढून टाकलं. आमच सरकार असताना. आणि इकडे प्रेम करणारी असूदे प्रेम करून मारहाणही करता तुमची परवानगी असेल तर दहादहा बायका करा पण कोणाचा खून करू नका, असे वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर यांचे नाव न घेता निशाणा साधलाय.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मकोका लावू, सुत्रधाराला अटक करू अशा वल्गना केल्या. यांचा सुत्रधार हा वाल्मिक कराड आहे हे लपून राहिलेले नाही. वाल्मिक कराडांच्या सुरस कथा आता समोर येत आहेत. मला वाटते अनेक खून झाले आहेत त्यात वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले..
कराड सरकारचा जावई आहे का ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का असा सवाल आज माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले