दहा जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण

0
381

दुचाकी पायावर घालून दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता शिवार चौक, पिंपळे सौदागर येथे घडली.

आकाश सुनील कोळी, अभिषेक प्रकाश श्रीमंगले, आनंद सीताराम यादव, भावेश सुरेश पाटील, सुमित पोपट भोसले, अतिश सावंत आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ सुनील चाबुकस्वार (वय 23, रा. डिलक्स चौक, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ आणि त्यांचा मित्र क्रिश हे फिर्यादी यांच्या आईसाठी गुडघे दुखीच्या गोल्याआन्ण्यासाठी शिवार चौकातील मेडिकल दुकानात जात होते. तिथे आरोपी आकाश कोळी याच्या दुचाकीचे चाक सिद्धार्थ यांच्या पायावरून गेले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून आरोपींनी फिर्यादी सिद्धार्थ आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.