दहशत माजविल्या प्रकरणी तडीपार गुंडास शस्त्रासह अटक

0
320

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजविल्या प्रकरणी तडीपार गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 24) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे करण्यात आली.

निहाल महंमद शेख (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतिश कुडके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निहाल शेख याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 17 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ कोयता बाळगून ‘मी इथला भाई आहे, कोणाला सोडणार नाही’ अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी दुकानाचे शटर ओढून दुकाने बंद केली. तसेच लोकांनी दारे खिडक्या बंद केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.