दहशत करून तरुणाला दगडाने मारहाण

0
387

तळेगाव दाभाडे, दि. १२ (पीसीबी) – तरुणाने मित्राला फोनवरून बाबा उर्फ कुणाल ठाकूर हा कुठे आहे, असे विचारले. त्यावरून तिघांनी तरुणाला दहशत निर्माण करून तरुणाला दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी पाच वाजता तळेगाव दाभाडे येथे घडली.

धीरज विजय गायकवाड (वय २८, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कौस्तुभ उर्फ केजी किसन जगताप (वय २०, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह धीरज अनिल गरुड आणि कुणाल मोहित दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांनी त्यांचा मित्र सुदेश याला फोन करून ‘बाबा उर्फ कुणाल ठाकूर हा कुठे आहे’ असे विचारले. त्यानंतर आरोपी कुणाल याने सुदेशच्या मोबाईल वरून फिर्यादी गायकवाड यांना फोन केला. ‘तुला बाबा उर्फ कुणाल ठाकूरकडे काय काम आहे’ असे विचारून फोन कट केला. शनिवारी दुपारी पाच वाजता गायकवाड कांतीलाल इंग्लिश मिडीयम शाळेकडे जाणा-या रस्त्यावर थांबले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी गायकवाड यांना ‘तुला लय मस्ती आली आहे का. बाबा ठाकूर कोण आहे तुला माहिती नाही का. बाबा आमचा भाई आहे. त्याच्याविषयी कशाला विचारतोस’ असे म्हणून दहशत निर्माण करत गायकवाड यांच्या डोक्यात दगडाने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.