दवा बाजारमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून

0
191

पिंपरी दि. २५(पीसीबी)- चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. सागर कांबळे (२२, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारमध्ये एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, निगडी आणि चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी शेजारीच आनंदनगर येथे राहणाऱ्या सागर कांबळे याला अज्ञातांनी दगडाने ठेचल्याचे समोर आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून यामध्ये आरोपी कैद झाले आहेत. त्यानुसार, आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आली आहेत. मृत सागर याचा सात दिवसांपूर्वी मुलीला छेडल्याच्या कारणावरून एकाशी वाद झाला होता. त्यावेळी देखील काही जणांनी मिळून त्याला मारहाण केली होती. या सर्व बाबी विचारात घेऊन निगडी पोलिसांचा तपास सुरू आहे.