दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

0
85

दि. ३१ जुलै (पीसीबी) हिंजवडी,
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. तर दोघेजण पळून गेले. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडली.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार गणेश बाबु गिरीगोसावी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विष्णू दिनंवर पवार (वय 20, रा. वडगाव, ता. मावळ), करण राहुल लोखंडे (वय 18, रा. काळाचडक, वाकड), अरविंद अमर कोळी (वय 18, रा. शंकरवाडी, देहू), साहिल सतिश सुरुशेे (वय 18, रा. म्हातोबा मंदीर रोड, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ऋषिकेश जाधव आणि बाबू शेख (दोघेही रा. काळाबडक, वाकड) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून हिंजवडी येथील शेल पेट्रोल पंप येथे दरोडा घालण्याच्या तयारीत असताना मिळून आले. त्यांच्याकडून दोन कोयते, एक पालघन, मिरची पावडर व दोरी अशी शस्त्र हस्तगत करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.