दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष; 80 लाखांची फसवणूक

0
51

चिंचवड, दि. 27 (पीसीबी) : प्रत्येक महिन्याला दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांकडून 80 लाख 27 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑगस्ट 2024 च्या शेवटच्या आठवडयात ते 26 नोव्हेंबर पर्यंत वाकड येथील इराणी कॅफे येथे व ऑनलाईन माध्यमातून घडली.

प्रसन्न यशवंत बालवडकर (वय 26, रा बालेवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओरीस कॉईन कंपनीचे भारतातील हेड व चालविणारे राहुल खुराणा, अविनाश सिंग, रवि ठाकुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन फिर्यादी यांना ते ओरीस कॉईन कंपनीचे भारतातील प्रमुख असल्याचे भासवले. त्यांना ऑनलाईन ओरीस कॉईन ही क्रिप्टो करन्सीची कंपनी असल्याचे सांगून कंपनीच्या वेबसाईटची माहीती देऊन तसेच त्यांचे अॅप्लिकेशनवरुन त्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 10 टक्क्यांनी 5 वर्ष खात्रीशीर परतावा देण्याबाबतचे अमीष दाखवले. फिर्यादी तसेच फिर्यादी यांचे भाऊ शिवम बालवडकर यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे my.oristeams.net या वेबसाईटवर आयडी तयार केले. फिर्यादीस 25 लाख 30 हजार रुपये व त्यांचे भाऊ शिवम बालवडकर यांना 54 लाख 97 हजार 500 रुपये असे एकूण 80 लाख 27 हजार 500 रुपये वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर भरण्यास भाग पाडले. त्याचा परतावा न देता त्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.