दंड करणा-या वाहतूक पोलिसासोबत बाचाबाची

0
248

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – विरुद्ध दिशेने वाहन चालवल्या प्रकरणी दंडाची पावती करत असताना दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसासोबत बाचाबाची केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सव्वासात वाजता पीसीएमटी चौक, भोसरी येथे घडली.

पोलीस हवालदार दत्तू बोराडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शोयब अशरफ अली शेख (वय 25, रा. दिघी रोड, भोसरी), आदित्य मुकुंद लोंढे (वय 24, रा. दिघी रोड, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोराडे हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता पीसीएमटी चौक, भोसरी येथे वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. बोराडे यांनी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला. वाहन चालविण्याचा परवाना पाहून विरुद्ध दिशेने आल्याबद्दल दंडाची पावती केली. त्यावेळी आरोपी दोघेजण बोराडे यांच्या अंगावर धावून आले. बोराडे यांना उद्धटपणे बोलून बाचाबाची करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.