आपण जगतो ते नक्की कशासाठी?
माती हवी अन्न पिकवण्यासाठी,
पाणी हवं जगण्यासाठी,
हवा हवी श्वास घेण्यासाठी.
पण हे तिन्ही आज दूषित झाले आहेत सूर्य तापतोय, ऋतूचक्र बदलतय आणि आपण? फक्त हे सर्व पाहत आहोत, शांतपणे.
आपल्याला वाटतं, आपण सगळं विकत घेऊ शकतो.पण पृथ्वीचं संतुलन, निसर्ग आणि जीवन हे खरेदी करता येत का? आपण माणूस हे विसरलो की आपण या पृथ्वीचा भाग आहोत तिचे मालक नाही…
जंगल म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे, झाडं तिचा श्वास. आपणच तो श्वास तोडतोय.
नद्या अडवल्या, डोंगर खोदले, जंगलं नष्ट केली आणि त्याचे परिणाम आपल्याच दारात उभे आहेत पूर, दुष्काळ, वणवे, तापमानवाढ, हवामान बदल.
आज शेतकरी त्रस्त, आदिवासी विस्थापित, समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि माणूस स्वतःपासून दुरावला आहे. महानगरांनी गिळलेली गावं हे सगळंच. तर विचार करा, पृथ्वी नाही राहिली, तर आपण कुठे राहणार.कसे जगणार ?
मंजुल भारद्वाज रचित “The…Other World” एक असं नाटक जे प्रत्येकाला स्वतःच्या मुळाशी नेऊन
निसर्गाशी नातं जोडते आणि आपल्या आतील प्रकृतीला पुन्हा जिवंत करतं.
कारण पृथ्वीचं रक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण. पर्यावरणाचे रक्षण 🌱
21 फेब्रुवारी, शनिवार संध्याकाळी ५:३० ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी पिंपरी चिंचवड पुणे येथे प्रस्तुत करणार आहोत.
संपर्क –
सायली पावसकर 9653437014
तुषार म्हस्के 9029333147










































