थेरगाव सोशल फाउंडेशन ची कॅन्सरग्रस्तांसाठी केसदान चळवळ..

0
244

थेरगाव, दि. ७ (पीसीबी) – थेरगाव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांना केस दान ही चळवळ गेले दोन वर्ष सुरू करण्यात आली होती ती TSF कोर मेंबर राहुल सरोदे यांच्या माध्यमातून राहुल यांनी स्वतःचे केस हे कॅन्सर रुग्णांना दोन वेळा दान करून या चळवळीला सुरुवात केली त्यांच्या या केस दान उपक्रमाला प्रोत्साहित होऊन TSF चे सदस्य अभिनव पांचाली हे ही या चळवळीमध्ये आपले स्वतःचे केस दान करून सहभागी झाले थेरगाव सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून हे उचललेले पाऊल कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केमोथेरेपी मुळे केस गळतात व त्यांना पुन्हा केस उगवणे खुप अवघड असते.

आजारपणामुळे तर ते खचलेले असतातच त्याचबरोबर आता डोक्यावर केस नसलेल्या, आजारी परिस्थितित लोकांपुढे/ समाजात कसे वावरायचे?

लोक काय म्हणतील? यातून त्यांचा आत्मविश्वास हरवला जातो, या किचकट, वेदनादायी उपचारात ज्याने आधीच संपूर्ण लढ्यासह बरेच संघर्ष केले होते आशांचा पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काहीतरी मदत ट्रस्ट या संस्थेला केसदान करण्याचा निर्णय मदत ट्रस्ट ही संस्था मुंबईस्थित असुन खास कर्करोगावर उपचार प्रदान करत असलेल्या टाटा हाॅस्पिटलशी संलग्न राहुन आपण दान दिलेल्या केसांचा वापर टोप (विग) बनवण्यासाठी करते आणि ते विग जे रुग्ण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते खरेदी किंवा विकत घेऊ शकत नाहीत अशाकर्करोगाशी लढत असलेल्या रुग्णांना मोफत देते.

मदत ट्रस्ट यांनी माझे केस नम्रपणे स्वीकारुन मला प्रशंसापत्र/प्रमाणपत्र देखील पाठवले…..
आणि हे सर्व करत असताना मला माझे कूटुंबीय, सहकारी मित्र परिवार यांचा खुप मोठा पाठिंबा मिळाला…..
मृत्यू नंतर आपण अवयव दान करू शकतो, पण जिवंतपणी आपण “रक्तदान व केसदान” करू शकतो,
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केसदान ही संकल्पना समाजात फारशी रुजलेली नाही याच विचारातुन आम्ही जनजागृती करत आहोत.आपक्क्ण ही या चळवळीत सामील व्हा, आपल्याला किवा आपल्या ओळखीमध्ये कोणाला केसदान करायचे असतील तर आम्हाला संपर्क करा..