थेरगाव रुग्णालयातील अनुचित प्रकारसामाजिक कार्यकर्त्याला अपमानित करून धमकी

0
237

थेरगाव , दि. २९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयामध्ये दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री युनूस पठाण कोविड योद्धा यांना तेथील कर्मचारी यांच्याकडून अपमानास्पद वागणुकी बरोबरीने बघून घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी युनूस पठाण यांनी सदर घटनेचा प्रकार रुग्णालयाचे प्रमुख श्री राजेंद्र फिरके यांना लेखी तक्रारी स्वरूपात कळविला असून अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याचे स्पष्ट दिसत आहे . यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये सध्या संभ्रमित वातावरण निर्माण झाले आहे . सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका शासन प्रशासन विभाग तसेच रुग्णालयांमध्ये अशा स्वरूपाची वागणूक मिळणे हा नवा विषय नसला तरी अशा वागणुकीतून प्रशासनाचे सर्वसामान्य बाबत असलेले धोरण हे चुकीचे असल्याचे दिसत आहे याबद्दल श्री युनूस पठाण सामाजिक कार्यकर्ते कोविड योद्धा यांनी पोलीस महासंचालक मुख्यमंत्री व इतर संबंधित जबाबदार विभागांना पत्रव्यवहार केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं मत घेतल्या असता असे निदर्शनास येते की प्रशासन हे सदर दोषी इसमाच्या पाठीशी खंबीर उभे राहून सदर घटनेकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे यामुळे पिंपरी चिंचवड मधील युनूस पठाण यांच्या संपर्कात असलेले सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ते यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे सदर गंभीर घटनेच्या विरोधात निषेधार्थ पठाण यांच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड मधील सर्व पक्ष गट संघटना पदाधिकारी महिला बचत गट महिला मंडळ व कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमानाने अनुक्रमे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे थेरगाव येथील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवन यांच्या प्रवेशद्वारा वरती बेमुदत जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युनुस पठाण यांनी दिला आहे .