थेरगाव रुग्णालयाचे अधिकारी मनोज भावसार यांचे अपघाती निधन

0
323

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील अधिकारी मनोज मधुकर भावसार (वय-५५ ) यांचे मध्यरात्री पुणे- मुंबई द्रूतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी डॉ. शैलजा भावसार, एक मुलगी, आई असा परिवार आहे.

कोकणात एका धार्मिक कार्यक्रमासाठी भावसार आपल्या कुटुंबियांसह गेले होते. परत येत असताना आपल्या सहकाऱ्यांची वाहने मागे राहिली म्हणून ते वाट पहात थांबले होते. त्यांच्या पत्नी आणि मुलगी कारमध्ये बसून होत्या, तर स्वतः भावसार हे रस्त्यावर उभे होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही कळण्याच्या आत वेगात आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्यातच जागेवर त्यांचा मृत्यू झाला.
भावसार यांच्या अपघाती निधनामुळे महापालिकेतील वैद्यकीय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. अत्यंत मनमिळावू, सामाजिक कार्यात सतत आघाडीवर आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. शहरातील भावसार व्हिजन या संस्थेचे ते सक्रीय पदाधिकारी होते. सायंकाळी ५ वाजता भाटनगर येथील स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.