थेरगाव येथे भर दिवसा तीन लाखांची घरफोडी

0
408

थेरगाव, दि. २१ (पीसीबी) – थेरगाव येथे भर दिवसा घरफोडी झाली. यात चोरट्यांनी दोन लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत नम्रता हाऊसिंग सोसायटी, थेरगाव येथे घडली.

संदीप गजानन पांचाळ (वय ३४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ यांच्या घराच्या खिडकीवाटे घराच्या दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून दोन लाख ८८ हजारांचे सोन्याचे दागिने, दोन हजारांचा मोबाईल फोन आणि पाच हजारांचा मॉनिटर असा एकूण दोन लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.