थेरगाव मध्ये उघड्या दरवाजा वाटे चोरी

0
125

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) -उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करत चोरट्याने दागिने आणि रोख रक्कम असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी जय मल्हार नगर, थेरगाव येथे उघडकीस आली.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 65 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.