थेरगावात विवाहितेचा छळ करून तिचा मृत्यू प्रकरणी पतीला अटक

0
344

थेरगाव, दि. २० (पीसीबी) : पत्नीचा अमानुष छळ करत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 2016 ते 18 फेब्रुवारी (शुक्रवार) 2024 या कालावधीत थेरगाव येथे घडली आहे.

लखन परमेश्वर झुंडरे (वय 36 रा. थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात मयुर संजय कतले (वय 27 रा.अहमदनगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 31 वर्षीय बहिणीला आईरोपी याने शारिरिक व मानसिक छळ करत होता. त्याने फिर्यादीच्या बहिणीच्या मांडीवर जखमा केल्या होत्या. त्या जखमा मध्ये इन्फेक्शन झाल्याने फिर्यादीच्या बहिणीचा मृत्यू झाला. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.