थेरगावातील भाजपच्या या तीन उमेदवारांचे अर्ज बाद

0
12

दि.३१(पीसीबी)-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे तीन आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दोन एबी फॉर्म छाननीमध्ये बाद झाले आहेत. आता त्या उमेदवारांना अपक्ष रहावे लागणार आहे.थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार
सिध्देश्वर बारणे, गणेश गुजर, करिश्मा बारणे यांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार अर्ज दाखल केलेले प्रभाग ३० फुगेवाडी-दापोडीचे उमेदवार निलेश हाके आणि प्रभाग १९ चिंचवडगावमधील पोर्णिमा आमराव यांचे अर्ज सुचक आणि अनुमोदक या मुद्यावर बाद झाले.