थेरगाववासीयांची सुरक्षा वाढवण्याच्या उपाययोजनांची मागणी

0
3

थेरगाव,दि.21 (पीसीबी)
थेरगाव येथील गंगा मेडोज सोसायटीमध्ये १८ डिसेंबर रोजी घडलेल्या घरफोडी घटनेबरोबरच थेरगावमध्ये दरोड्याच्या घटनांनी हाहाकार माजवला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गुन्ह्यात चार दरोडेखोरांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. समर्थ करीना सोसायटी आणि रॉयल कॅसल येथे तत्सम घटना आणि त्याचे प्रयत्न झाले आहेत, या घटनां पुढील काळात घडू नयेत यासाठी त्वरित कारवाई करावी या मागणसाठी,थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे शिष्टमंडळ थेरगाव परिसरातील ४८ सोसायट्यांच्या वतीने दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी काळेवाडी पोलीस स्टेशन व वाकड पोलिस स्टेशन या ठिकाणी भेट दिली. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांची भेट घेतली व अधिकाऱ्यांना थेरगाववासीयांच्या सुरक्षितते साठी उपाययोजना करण्यासाठी विनंती केली
थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनने पोलिसांना थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदीया सारख्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

या विषयावर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की ते भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यकत्या सर्व उपाययोजना नक्कीच करतील.
तसेच नागरिकांनी सुद्धा या विषयी जागरूक राहुन संशयास्पद घटनेची माहितीबाबत तात्काळ 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.