थेरगावमध्ये महिलेची दहा लाखांची फसवणूक

0
130

वाकड, दि. 11 (पीसीबी) – तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असल्याचे सांगत चौकशीच्या नावाखाली एका हिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना थेरगाव येथे 4 जुलै रोजी घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9818697441 या मोबाईल वरील अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. तुमचे पार्सल मुंबई येथून इराकला जात आहे. त्यामध्ये आठ पासपोर्ट, पाच किलो कपडे, दोन आयपॅड आणि त्यात 300 ग्रॅम अंमली पदार्थ मिळाले आहेत. खात्री करण्यासाठी फिर्यादी यांच्या मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी यांना आयडी लॉग इन देऊन फिर्यादी यांना त्यांचे आधारकार्ड दाखविले. तुमच्या आधारकार्डला भरपूर बँक अकाऊंट लिंक असल्याचे सांगत फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करून त्यांच्या नावावर पाच लाख 66 हजार 312 रुपयांचे कर्ज काढले. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून दहा लाख रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.