थुंकल्याचा जाब विचारल्याने दोघांना बेदम मारहाण

0
277

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) – बिल्डींगच्या पार्किंग मध्ये थुंकल्याचा जाब विचारल्याने चौघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पिंपरी गाव येथे घडली.

हेमंत शांताराम कांबळे (वय 30, रा. पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेंद्र बाबुराव सोनवणे (वय 55), त्यांची पत्नी, जावई आकाश गोरख कांबळे (वय 55), आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेंद्र हा बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये थुंकला. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता त्याने इतर आरोपींना बोलावून घेत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण केली. यात दोघेजण जखमी झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.