त्या वेळी बैलगाडा शर्यतील मर्सिडीस कार भेट देणार

0
551

– देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या वर्षी बक्षिस देण्याचे नितेश राणे यांचे आश्वासन
भोसरी, दि. १ (पीसीबी) – राज्यात बैलगाडा शर्यत ही चर्चेतला विषय आहे, या दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बैलगाडा शर्यतीसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या विजेत्याला मोठं बक्षीस देण्याची घोषणा केलीय पण त्यासाठी त्यांनी एक अट देखील घातली आहे.

आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंवरून बैलगाडा शर्यतीची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या २२ सेकंदांच्या व्हिडिओसोबत त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, त्या वर्षी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) त्यांच्याकडून मोठं बक्षीस देण्यात येईल आणि हे बक्षीस एक मर्सिडिज गाडी असणार आहे.