‘त्या’ धोकादायक इमारत प्रकरणी तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल

0
139

थेरगाव मधील 24 मीटर डीपी रोडच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना ती अचानक झुकल्याचे निदर्शनास आले. याबाबत कारवाई करत महापालिकेने ती इमारत पाडली. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी घडला. मात्र याप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेचे उप अभियंता सुनील अहिरे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील दिलीप डोलवानी (रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोलवानी यांनी 24 मीटर डीपी रोड, थेरगाव येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. बांधकाम जवळपास अंतिम टप्प्यात असताना ती इमारत अचानक झुकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेने पाहणी करत ती इमारत पाडली. इमारत धोकादायक असल्याने पाडल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र या प्रकरणी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटल्या नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.