… त्यांना राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद बांधायची होती

0
225

नाशिक, दि. १८ (पीसीबी) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देशविरोधी कारवाईच्या आरोपाखाली एटीएसने ताब्यात घेतले आहे. या संघटनेशी संबंधित धक्कादाक खुलासे सुनावणीदरम्यान पुढे येत आहेत.२२ सप्टेंबर २०२२ रोजी एटीएसने राज्यभर छापे मारुन पीएफआयशी संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये मालेगाव येथून एक, कोल्हापूर येथून एक, पुण्यातून दोन आणि बीडमधून एकाला ताब्यात घेतले. या सर्वांना काल नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.एटीएसच्या तपासामध्ये ‘पीएफआय’ला अयोध्येत उभारलं जात असलेलं राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारायची होती. २०४७पर्यंत पीएफआयला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन होता, अशी माहिती समोर आलेली आहे. सरकारी पक्षाने नाशिक कोर्टामध्ये ही माहिती दिली.

दरम्यान, न्यायालयाने या संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एटीएसने मात्र अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवली आहे.एटीएसने तपासामध्ये संशयितांकडून हार्डडिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रं हस्तगत केली आहेत. विशेष म्हणजे १७७ लोकांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता. ज्याचा ॲडमिन पाकिस्तानात आहे. शिवाय विविध देशांतील लोक या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमधील चॅटिंग संशयास्पद आणि संवेदनशील असल्याचं पुढे येत आहेत. त्यामुळे न्यायालयाने योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहन सरकारी पक्षानं केलं आहे.