तो टेस्ट ड्राईव्हला रॉयल एनफिल्ड घेऊन गेला तो परत आलाच नाही

0
321

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – मध्यंतरी सोशल मीडियावर एक फनी व्हिडीओ व्हारल झाला होता त्यात चप्पलच्या दुकानात शुज ट्राय करणारा ग्राहक तेथून पळतो. विक्रेताही त्याच्या मागे पळत जोतो मात्र तो ग्राहक परत येतो कारण तो फक्त शुज ट्राक करत असते. असाच प्रकार हिंजवडी येथे घडला आहे. मात्र याप्रकरणात ग्राहकाने टेस्ट ड्रायव्हसाठी नेलेली रॉयल एनफिल्ड परत केलीच नाही.

हि घटना 30 मार्च रोजी दुपारी घडली असून याप्रकऱणी सौरभ राजेश सोनी (वय 27 रा.गहुंजे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सार्थक संजय राय (रा. पटणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची रॉयल एनफिल्ड (एमएच 02 इव्ही 4085) विश्वासाने आरोपीला टेस्ट ड्राईव्ह साठी दिली. मात्र आरोपीने टेस्ट ड्राईव्हला दिलेली गाडी परत केलीच नाही. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.