तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले

0
120

रावेत,दि. ०३ (पीसीबी)

पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध व्यक्तीचे दागिने काढून घेत त्याची फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि. 2) सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास चंद्रभागा कॉर्नर जवळ रावेत येथे घडली.

चंद्रकांत पांडुरंग नायक (वय 68, रा. चंद्रभागा कॉर्नर जवळ, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांना पोलीस असल्याची बतावणी केली. हातचलाखी करून फिर्यादी यांच्याकडील चेन आणि अंगठी घेऊन त्यांची 85 हजारांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.