तोतया एसबीआय अधिकाऱ्याने ऑनलाईन लांबवले १७ लाख

0
157

पुणे, दि. १२ (पीसीबी) – स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलत असल्याची बतावणी करीत महिलेचे पेन्शन सुरू करण्याच्या आमिषाने तिला ‘कस्टमर सपोर्ट’ नावाचे ॲप इंस्टॉल करायला लावत १७ लाख ७५-हजार रुपयाचा घोळ केला.

कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे : स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलत असल्याची बतावणी करीत महिलेचे पेन्शन सुरू करण्याच्या आमिषाने तिला ‘कस्टमर सपोर्ट’ नावाचे ॲप इंस्टॉल करायला लावत १७ लाख ७५-हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून घेण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ नोव्हेंबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान कोंढवा येथील एनआयबीएम रस्त्यावर घडला.

याप्रकरणी ममता सुनील कर्ण (वय ५४, नियती सोसायटी, मोहम्मद वाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मोबाईल क्रमांक धारकाने ममता यांना फोन केला. तो एसबीआय मधून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांची पेन्शन चालू करण्यासाठी मोबाईल मध्ये कस्टमर सपोर्ट नावाचे ॲप इन्स्टॉल करायला लावले. त्यानुसार ममता यांनी मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळवत आरोपीने त्यांच्या खात्यातील १७ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.