दि. २३ जुलै (पीसीबी) चिखली,
आपण दिव्यांग आयुक्त असून दिव्यांग कोट्यातून तुम्हाला दारू दुकानाचा परवाना काढून देतो, असे सांगत एकाची दहा लाख 65 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रुपीनगर, तळवडे येथे घडली.
सतीश लक्ष्यण परदेशी (वय 45, रा. करवीर हाउसींग सोसायटी, रूपीनगर, तळवडे) यांनी सोमवारी (दि. 22) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय दामोदर म्हस्के (रा. मानोरी, पो. नांदुर शिंगोटे, ता. सिन्नर, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी म्हस्के याने तो तो दिव्याम असल्याचा फायदा घेत फिर्यादी परदेशी यांचा विश्वास संपादन केला. तसच त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासनाचे नाव असलेला बोर्ड व वाहनात हॅश बोर्डवर नारंगी अंबर दिवा लावला. गळयात महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग आयुक्त या पदाचे ओळखपत्र घालून शासनाचा दिव्यांग आयुक्त असल्याचे भासविले. फिर्यादी परदेशी यांना दिव्यांग कोटयातुन एफएल-२ वाइन शॉपचे लायसन काढून देतो, असे सांगून 10 लाख 65 हजार रूपयांची फसवणुक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.