…तोच खरा शिक्षक – किसन महाराज चौधरी

0
448

पिंपरी दि. ६ (पीसीबी) – देशाची भावी पिढी सदृढ़ , सुसंस्कृत व सुशिक्षित घडविण्यासाठी शिक्षकानी ‘ वेतना पेक्षा वतनाचा म्हणजे देशाचा विचार करावा, असे मत सेवानिवृत शिक्षक, किसनमहाराज चौधरी गुरुजी यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त आकुर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित शिक्षकांच्या गौरव समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सुरेश महाराज वारके, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी उपस्थित होते. शिक्षकांच्या आदर्शाचे अनुकरण विद्यार्थी करतात. शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडविणारे एक विद्यापीठच आहे. चांगली पिढी घडवणे प्रत्येक शिक्षकांचे कर्त्यव आहे. गुरुशिष्य परंपरा ही पुराण काळापासून लाभलेली भारतीय संस्कृतिची देणगी आहे. व्यास ऋषि ते स्वामी विवेकानंदांपर्यंत आलेल्या या परंपरचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत सुप्रसिद्ध कीर्तनकार सुरेश महाराज वारके यांनी व्यक्त केले.

माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या हस्ते आकुर्डी भागातील एकूण 32 शिक्षक व शिक्षिकांचा सन्मानचिन्ह , शाल , व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. शैलजा चौधरी, अरुणा सिलम, इंदिरा शेट्टी, अनघा रत्नपारखी, प्रा. सचिन काळभोर, प्रशांत चव्हाण, जगदीश चव्हाण, संतोष पाचपुते, सलाम इनामदार, सतीश अनारसे, सुनीता चौधरी, आनंद शिंदे, सतीश शिंदे,बजरंग जाधव,फूलचंद पाटील,मनीषा जाधव,भावना जैस्वारा,सुरेश जगताप,गीता सोनके ,अलका कांबळे रावसाहेब कांबळे,अरविंद मोरे, रफिक इनामदार,वनिता पवार ,संजीवनी देवरे,रुपाली भालेराव,अलका जगताप,सुनीता शिंदे,ऍन स्टेनली, दीपाली कांबळे,सविता क्षीरसागर,मोहिनी आणेकर,रंजना शिंदे या सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक,आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले.
यशवंत भालेराव , वसंत सोनार , अण्णा भोसले , गौतम बेंद्रे , गंगाधर चौधरी , संपत शिंदे , जयसिंग पाटील , बाळू तिरोडकर गुगळे काका , आशा मराठे , ललिता माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाहरुख शेख , सुनील मोरे , दिपक सावंत यांनी केले. तर प्रकाश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.