तेल खरेदीच्या बहाण्याने योगा टिचर ची 29 लाख रुपयांची फसवणूक

0
72

हिंजवडी, दि. ६ –
नुप्रूगा एक्स सोल्यूशन हे तेल खरेदी करण्याच्या बहाण्याने एका महिला योगा टिचरची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 2 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत बावधन येथे घडली आहे.

याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. आर. सी, रिया कंपनी, ट्रॅक ऑन, कुमार एन्टरप्रायजेस कंपनी व विविध मोबाईल धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुप्रूगा एक्स सोल्यूशन नावाचे तेल खरेदीच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी आरोपींनी संपर्क साधला. त्यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण 29 लाख 79 हजार 980 रुपये घेवून त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.