मुंबई, दि. १८ (पीसीबी) – नवी मुंबईतल्या खारघर येथे राज्य शासनाच्या वतीने आयजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे तब्बल १३ भाविकांचा मृत्यू झाल्याने मोठा हाहाक्कार माजला होता. नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या दुर्घटनेवर तीव्र प्रतिक्रीया सुरू झाल्यने लोकांचे लक्ष्य विचलित कऱण्यासाठीच अजित पवार यांच्या संभाव्य पक्षांतराच्या बातम्या माध्यमांतून पेरण्यात आल्याचे समजले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला लाखो श्री सेवकांची उपस्थिती होती. मात्र कडाक्याच्या उन्हाने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. आतापर्यंत १३ श्री सेवकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली, तर शिंदे यांनी राजीनीमा द्यावा, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे.
महाराष्ट्रा शासनाच्या नियोजनशुन्य आयोजनामुळेच निष्पाप लोकांचा बळी गेल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱा असंही पत्रात नमूद केलं आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच हे वृत्त आल्याने संशयाची सुई शिंदे गटावर आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे मंत्रीमंडळ आरोपिच्या पिंजऱ्यात असल्याने भाजपचीही मोठी बदनामी झाली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाल्याने दुर्घटनेबाबत शाह यांच्यावरही ठपका आहे. एकूणच या प्रकऱणाचा मोठा फटका भाजपला आगामी निवडणुकांत बसू शकतो. ते टाळण्यासाठी अजित पवार यांच्याबाबतच्या बातम्या पेरण्यात आल्या असाव्यात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.