तू माझ्याशी लग्‍न कर नाहीतर तुझे फोटो आणि व्‍हिडीओ नातेवाईकांना पाठवेल

0
56

महाळुंगे, दि. 29 (पीसीबी) : सोबत काम करणार्‍या मुलीचे अश्‍लिल फोटो व्‍हायरल करणार्‍या सुपरवायझरच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना निघोजे येथे घडली.

कृष्‍णा राठोड (वय ३२, रा. मु. पो. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत ५५ वर्षीय व्‍यक्‍तीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना २०२३ ते २६ नोव्‍हेंबर २०२४ या कालावधीत निघोजे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी एका कंपनीत कामाला होती. तिथे आरोपी राठोड हा सुपरवायझर होता. त्‍यावेळी आरोपी राठोड याने पिडित मुलीची ओळख करून तिचे अश्‍लिल फोटो आणि व्‍हिडीओ काढले. तू माझयाशी लग्‍न कर नाहीतर तुझे फोटो आणि व्‍हिडीओ नातेवाईकांना पाठवेल, अशी धमकी दिली. मात्र मुलीने आरोपीच्‍या प्रस्‍तावास नकार दिल्‍याने तिचे फोटो आणि व्‍हिडीओ फिर्यादी यांच्‍या भाच्‍याला पाठवून मुलीची बदनामी करीत तिचा विनयभंगही केला. महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.