तू माझी गाडी बंद केली, मी तुला सोडणार नाही असे म्हणत मारहाण

0
86

महाळुंगे, दि. 29 (पीसीबी) : कंपनीत सुरू असलेल्या दोन बस कंपनी व्हेंडरने बंद केल्या. याचा राग आल्याने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाने कंपनीतील कामगाराला माराहान केल्याची घटना सोमवारी (दि. २८) खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.

दीपक रामदास गायकवाड (वय ३६, रा. पूनावळे) यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार, अमोल लाड (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे सावरदरी येथील फिलिप्स कंपनीत कामाला आहेत. या कंपनीत आरोपीच्या दोन बस शुअर ड्राईव्ह या या वेंडरच्यावतीने सुरू होत्या. मात्र, काही कारणास्तव तीन महिन्यांपूर्वी वेंडरने या बस बंद केल्या. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली. तू माझी गाडी बंद केली, मी तुला सोडणार नाही, असे म्हणत फिर्यादीनुसार डोक्यात सिमेंटची विट मारली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.