तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला

0
263

नाशिक, दि. ७ (पीसीबी) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी आज थेट राणेंना अरेतुरे करत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. कोण आहात तुम्ही? आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला. या दाखवतो, असं आव्हानच संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंवर जोरदार टीका केली.

बाडगा जास्त मोठ्या बांग देतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो सिलिंडर जास्त मोठं करतो. सध्या हे सिलिंडर वर करून बोलत आहेत. तुम्ही आमच्याविरोधात उभं राहिला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी संयम राखायला सांगितलं. तुम्ही आमची काय उखाडणार? तू कोण आहे? लाचार माणूस आहे. दहापक्ष बदलतो घाबरून. डरपोक. आम्हाला डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला.

माझ्या माहितीनुसार नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जातंय. त्याला कारणं खूप आहेत. नवीन गटातील लोकांना सामावून घ्यायचं आहे. त्यामुळे राणेंना काढायचं सुरू आहे असं ऐकलं. पीएमओकडे आमचीही माणसं आहेत. आम्हालाही माहिती मिळते. मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडू नका, असं राऊत म्हणाले.

माझ्या आयुष्यात मी पक्ष सोडल्यावर राणेंना भेटलो नाही. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली हे चांगलं झालं, असा चिमटा त्यांनी काढला. आम्ही राणेंवर टीका केली नाही. टीका करण्यास सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवर घाणेरड्या शब्दात चिखलफेक करण्याचं काम या माणसाने केलं.