तुर्की भूकंप बळी आकडा १० हजारावर

0
314

तुर्की, दि. ७ (पीसीबी)- सोमवारी आलेल्या भीषण भूकंपामुळं तुर्की आणि सीरियामध्ये परिस्थिती अतिशय भयावह वळणावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 7.8 रिश्टर स्केलच्या पहिल्या भूकंपानंतरही तुर्कीमध्ये जवळपास तीनहून अधिक भूकंपाचे धक्के बसले. यानंतर इथं थोड्याथोड्या अंतरावर सातत्यानं धरणीकंप जाणवल्याची माहितीसुद्धा स्थानिक वृत्तसंस्थानी दिली. अतिशय भयाण अशा भूकंपानंतर तुर्कीमध्ये मृतांचा आकडा 4000 च्याही वर पोहोचला. नैसर्गिक आपत्तीमुळं ओढावलेलं हे संकट पाहता सध्या तुर्कीला मदतीचा हात देण्यासाठी भारताकडूनही एनडीआरएफचं (NDRF) पथक रवाना झालं आहे.