तुमची पद्धत मराठ्यांबाबत वापरू नका नाहीतर…… मनोज जरांगेचा अमित शहांवर हल्लाबोल

0
53

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन करतान जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटवू शकत नाही. पण तुम्ही आरक्षण नाही दिली तर मात्र तुम्हाला चिलमीत चहा प्यायची वेळ येईल. लय अवघड असतं भाऊ. ती वेळ येईल मग. ती वेळ येऊ द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत मला माहीत आहे. तुम्हाला वाटत असेल हे खेड्यातलं आहे. पण मी सर्व आंदोलनांचा अभ्यास केला आहे. तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून, आरक्षण न देता आंदोलन हाताळू असं तुम्हाला वाटत असेल तर अमित शाह साहेब तुमची आयुष्यातली ही घोडचूक असणार आहे. तुम्ही जी काही यंत्रणा आणली तरी तुम्ही महाराष्ट्रात संविधानाच्या पदावर बसणार नाही असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

तुमच्याकडे आंदोलन हाताळयाची दुसरी पद्धत आहे. तुम्ही आमचं नाव घेतलं म्हणून. गुर्जर, पटेल यांचं आंदोलन हाताळलं तसं तुमच्या पद्धतीने आंदोलन हाताळायचं आहे तुम्हाला.परंतू तुमची पद्धत म्हणजे काय कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी तुम्ही खायची ही तुमची घाण सवय आहे ना अमित शाहसाहेब ही सवय तुमच्यासाठी घातक आहे. मला बोलायची गरज नव्हती. तुम्ही आम्हाला त्यात ओढलं. तुम्ही प्रत्येकवेळी तुमच्या स्टाईलने काम केलं आहे. पण मराठे ऐकणार नाहीत असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

तुमची तोगडीया, अशोक सिंघल, आडवाणी यांची टीम होती. यांनी त्यांचा देह झिजवला. ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुम्ही साधलं. पण मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं. ज्या माणसाने देश पिंजून काढला. त्याचं नाव आडवाणी आहे. त्यांना कसं हाताळलं याचं आम्हाला काही घेणं नाही. ते तुमचं कुटुंब आहे. पण तुम्ही मराठ्यांना पटेल आणि गुर्जरांशी जोडू नका. आम्हाला तसं हाताळू नका. मराठ्यांशी वाईट नियत असेल तर बरोबर नाही. तुमची पद्धत मराठ्यांबाबत वापरू नका. नाही तर तीन ताळात ठेवणार नाही. तुम्ही पंतप्रधानांच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांना पायाखाली दाबलं, मनोहर पर्रिकर, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत तुम्ही ते केलं ते मराठ्यांसोबत करू नका. शिवराज सिंह चौहानने मध्यप्रदेश स्वच्छ केलं. त्या माणसाला कसं हाताळलं? सुषमा स्वराज यांना कसं हाताळलं? हे आम्हाला माहीत आहे. नितीन गडकरी त्या स्टेजला जाणार त्यांना कसं हाताळलं ? ते आम्हाला माहीत आहे असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.