तुमको मिरची लगी तो मै क्या करू?- देवेंद्र फडणवीस

0
108

तुम्ही हद्दपार केले आहे. तसेच 70 हजार कोटी बँक ठेवींमध्ये टाकले पण गिरणी कामगारांना घरे देखील दिली नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंवर फडणवीस यांनी टीका करताना अनेक आरोप केले आहेत. कोरोनाकाळात विकसित राष्ट्रांचा लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तो मोदींनी झुगारला आहे. पूर्वी 30 वर्षे भारताला लस देखील मिळत नव्हती. त्यामुळे लसनिर्मिती करू शकणाऱ्या 3 ते 4 देशांमध्ये आज भारत आहे. त्यामुळे उद्धवजी, तुमको मिरची लगी तो मै क्या करू? त्या काळात तुम्ही खिचडी, कफनचोरी करत होते असे टीकास्त्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सोडले आहे.

त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने विकसित भारताची निर्मिती भाजप करणार आहे. मुंबईत काँक्रीटचे रस्ते तयार झाले असून 50 वर्षे त्याकडे पाहण्याची गरज देखील नाही. मुंबई खड्डेमुक्त तर झाली आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असणार आहे. हे लबाड लांडगे निवडणूक आली की, कोल्हेकुई सुरू करतात,’ असे टीकास्त्र त्यांनी केले आहे.