तुझ्याशी मीच लग्‍न करणार; प्रेम कर नाहीतर आत्‍महत्‍या करेल; असे म्हणत अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग

0
71

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : तू माझ्याशी प्रेम केले नाही तर मी तुझ्या नावाने आत्‍महत्‍या करेल, अशी धमकी एका तरुणाने अल्‍पवयीन मुलीला दिली. तसेच तिचा विनयभंगही केला. ही घटना रुपीनगर, तळवडे येथे घडली.

यश विनोद मोरे (वय १९, रा. सोनावणे वस्‍ती, चिखली) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत १६ वर्षीय अल्‍पवयीन मुलीने चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना १९ सप्‍टेंबर ते २३ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १९ सप्‍टेंबर रोजी फिर्यादी या कॉलेजमधून सुटल्‍यावर घरी चालल्‍या होत्‍या. त्‍यावेळी आरोपीने तिला रस्‍त्‍यावत अडवून ओळख करून घेतली. तू माझयाशी प्रेम केले नाही तर मी तुझया नावाने आत्‍महत्‍या करेल, अशी धमकी दिली. तसेच अधून मधून फिर्यादी या पायी घरी जात असताना आरोपी अल्‍पवयीन मुलीचा पाठलाग करीत असे. २३ ऑक्‍टोबर रोजी सकाळी सव्‍वादहा वाजताच्‍या सुमारास आरोपी दुचाकीवरून आला. त्‍याने फिर्यादी मुलीच्‍या डोळ्यात डोळे घालून तुझयाशी मीच लग्‍न करणार, चल मी तुला मुंबईला घेऊन जातो, असे म्‍हटल्‍याने फिर्यादी तरुणीला कसेतरीच वाटले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.