खेड, दि. २७ (पीसीबी) – पुणे नाशिक महामार्गावरून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, या अपघातामुळे सकाळी तीन तास महामार्गावरची वाहतूक तब्बल पाच-सहा किलोमीटर पर्यंत ठप्प होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. दूध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांच्या चार- पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वाहने हटवण्याचे काम सुरू आहे…