तीन वर्षांपासून आपले वास्तव्य सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. विलास बाळशीराम मोरे (वय 38, रा. दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी विलास मोरे फरार होता. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून आरोपी विकास मोरे हा आपले वास्तव्य बदलून राहत होता. त्यामुळे तो पोलिसांना मिळून येत नसे.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी तांत्रिक विश्लेषण करून विकास मोरे याचा ठावठिकाणा शोधला. तो फुगे प्रायमा बिल्डींग, भोसरी येथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी विलास मोरे याच्यावर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक पोलीस अमंलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.