तीन वर्षांच्या अल्पवयीन मुली सोबत अश्लील कृत्य, ५५ वर्षीय आरोपीला अटक

0
314

पुणे, दि. ३० (पीसीबी): अवघ्या तीन वर्षांच्या अल्पवयीन मुली सोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना फुरसुंगी येथील आलिशान सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ५५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

यशवंत काळुराम जाधव (वय ५५) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी जाधव आणि फिर्यादी महिला एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. फिर्यादीची तीन वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि आरोपी जाधव याची नात या एकमेकांच्या मैत्रिणी आहेत.

पीडित मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळायला त्यांच्या घरी गेलेली होती. त्यावेळी आरोपी जाधव यांनी पीडित मुलीला घराच्या हॉलमध्ये नेले. दरवाजा बंद करून तिचे कपडे काढून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.