तीन चाकी टेम्पोचे दुचाकीला धडक; बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

0
4

भोसरी, दि. 21 (पीसीबी) : तीन चाकी टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर त्याची सात वर्षीय बहीण जखमी झाली आहे. हा अपघात रविवारी (दि. 20) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडला.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक अल्पवयीन मुलगा आणि टेम्पो मालक श्रीनिवास थोरात (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलांना घेऊन दुचाकीवरून जात होत्या. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर अल्पवयीन मुलाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर सात वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. टेम्पो चालक मुलगा अल्पवयीन असल्याचे तसेच त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे माहिती असताना देखील टेम्पो मालक श्रीनिवास थोरात यांनी टेम्पो चालविण्यास दिल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.