‘तिस्टा सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’ या विषयावर ‘विशेष संवाद’ !

0
255

तिस्टा सेटलवाड यांचे प्रकरण व्यापक असल्याने ते गुजरात ए.टी.एस्.कडून काढून एन्.आय.ए.कडे द्यावे ! – आर्.व्ही.एस्. मणी, माजी अवर सचिव, केंद्रीय गृहमंत्रालय

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाज यांना बदनाम करण्यासाठी ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे’ भासवून तिस्टा सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा वापर केला. तिस्टा सेटलवाड यांनी ‘हिंदु आतंकवादाचे पी.आर्. एजेंट’ म्हणून आतंरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. दंगलींचा वापर करून अनेक मुस्लिम राष्ट्रांकडून हजारो कोटी रुपयांचा निधी स्वत:च्या स्वयंसेवी संस्थांना मिळवला.

या निधीचा वैयक्तिक कारणांसाठी गैरवापर तर केलाच आहे; मात्र हिंदु समाजाला आतंकवादी ठरवण्यासाठी मोठी प्रसिद्धीमाध्यमे, न्यायपालिका, चित्रपटसृष्टी आणि अन्य माध्यमांना खरेदी केल्याचे अहवाल त्या त्या वेळी आले होते. काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री यांनी मनीलॉड्रींगद्वारे बरीचशी मदत तिस्टा सेटलवाड यांना मिळवून दिली आहे. हे आता सर्व उघड होणार आहे, तसेच आणखीन बरेच काही बाहेर येणार आहे. त्यामुळे तिस्टा सेटलवाड यांनी केवळ न्यायालयाला खोटी माहिती दिली म्हणून तिचे प्रकरण गुजरात ए.टी.एस्.कडे (‘आतंकवादविरोधी पथका’कडे) न ठेवता हे प्रकरण व्यापक असल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (NIA) दिले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव श्री. आर्.व्ही.एस्. मणी यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तिस्टा सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

माजी अधिकारी श्री. मणी पुढे म्हणाले की, तिस्टा सेटलवाड यांना मनमोहन सरकारने केवळ 80 कोटी रुपये दिले नाही, तर त्यासह वेगवेगळ्या मंत्रालयांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला आहे. त्यातून नक्षलवाद, तसेच यासिन मलिकसारख्या फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला जात होता. त्यांच्या बाजूने बातम्या छापण्यासाठी पत्रकारांना फ्लॅट, फॉरेन टूर आणि पैसे दिले जात होते.

या वेळी इतिहास अभ्यासक तथा लेखक अधिवक्ता सतिश देशपांडे म्हणाले की, तिस्टा सेटलवाड यांनी ‘सबरंग’ आणि ‘सिटीजन फॉर जस्टीस ॲन्ड पीस’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून स्वत:चे दुकानच उघडले आहे. गुजरात दंगलीत मदीनाबीबी या मुसलमान महिलेवर बलात्कार झालेला नसतांना तिच्याकडून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून ते न्यायालयात सादर करण्यात आले. हे नानावटी आयोगासमोर उघड झाले. तसेच तिस्टाकडे काम करणारा तिचा सहकारी रईस पठाण यांने तर तिच्यावर गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्याबरोबर तिस्टा सेटलवाड यांची भेट झाल्यावर सोनिया गांधी यांनी त्यांना काम करण्यासाठी सतत पैसे मिळत रहातील असे आश्वासन दिले होते. तसेच दुसरीकडे स्वयंसेवी संस्थेला मिळणार्‍या निधीपैकी 25 टक्के निधी तरी पीडितांसाठी खर्च करण्यास तिस्टाला सांगितले होते. त्यावर ‘50 टक्के निधी तर दलालच घेतात; तर बाकीचा 50 टक्के निधी आम्हालाच लागतो’, असे तिस्टाने सांगितले होते. त्यामुळे रईस पठाण यांची सखोल चौकशी केल्यास आणखीन बरेच काही बाहेर येईल, असे अधिवक्ता देशपांडे यांनी सांगितले आहे.