तिरंगा १९४६ साली कसा दिसत असावा, याचे दर्शन पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवड परिसरातील एएसएम महाविद्यालयात

0
303

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : आपल्या अभिमानाचा विषय असणारा तिरंगा १९४६ साली कसा दिसत असावा, याचे दर्शन पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवड परिसरातील एएसएम (औद्योगिक शिक्षण मंडळ) महाविद्यालयात नुकतेच घडले. देशाने आजवर लढलेल्या विविध युद्धप्रसंगात पराक्रमाच्या गाथा लिहिणार्या वीरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक ध्वज नागरिकांसमोर खुला करण्यात आला. नजिकच्या काळात या ऐतिहासिक ध्वजाचे उत्तम प्रकारे जतन करण्यात येणार आहे.

हा ऐतिहासिक ध्वज तब्बल ७५ वर्षे जपून ठेवत त्याची देखभाल करणारे देव नागर डेहराडून येथून ‘दिव्य मराठी ‘शी बोलताना म्हणाले, ‘कारगील विजय दिवस, १९७२ च्या युद्धातील विजयाचा सुवर्ण महोत्सव आणि सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती, असे त्रिविध औचित्य साधून हा ध्वज नागरीक आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी काॅलेजमध्ये ठेवण्यात आला होता. आजी माजी सारेच सेनानायक या ध्वजाच्या दर्शनाने भारावून गेले होते.

असा आहे ध्वज
हा ध्वज ९“१४ फूट अशा आकाराचा आहे. तो खादीच्या कापडाचा आहे. ध्वजावर मध्यभागी चरख्याची प्रतिमा आहे. इतक्या वर्षांनंतर ध्वज काहीसा खराब झाला असला तरी ध्वज पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील