पिंपरी, दि. २२ ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना अभिवादन करण्यासाठी काल (दि. २१ मे) रोजी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात गोकुळ हॉटेल ते पिंपरी चौक येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, सेना हमारी शान है किसान हमारी जान है, अशा घोषणा देऊन सैनिकांच्या शौर्याचं स्मरण करत यात्रेचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी चौक येथे करण्यात आला.
पहेलगाम येथे निष्पाप भारतीयांना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळ्या चालवून मारण्यात आले. यासाठी भारत सरकारने भारतीय सैन्याच्या परक्रमाने ऑपरेशन सिंधूर यशस्वीपणे राबविले. जल, वायू, स्थल या तिन्ही सैन्य दलाने देशाच्या संरक्षणासाठी दिवस रात्र लढा दिला. अशा सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी देशभर काँग्रेस पक्षाने तिरंगा यात्रा काढली आहे.
या प्रसंगी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा तेव्हा अशा शूरवीरांनी आपल्या सर्व भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश सुरक्षित ठेवला आहे. संकटाच्या काळात काँग्रेस पक्ष नेहमी देशाबरोबर राहिला आहे. भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रयत्न केला आहे. सैन्यांचे शौर्य व त्याग याची प्रेरणा काँग्रेस पक्ष नेहमीच घेत आलेला आहे, त्यामुळे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या तिरंगा यात्रे सहभाग घेऊन भारतीय सैन्याला मानवंदना देण्याचे काम केलेलं आहे.
समारोप सभेमध्ये भारतीय सैन्यामध्ये ज्यांनी लढाई प्रत्यक्षपणे लढली असे माजी सैनिक दत्तात्रय कुलकर्णी, मारुती नरहरी बराटे, प्रमोद केशव भदने यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, भाऊसाहेब मुगुटमल, अशोक मोरे, बाबू नायर, गौतम आरकडे, अमर नाणेकर, वाहब शेख, मयूर जयस्वाल, अॅड.अनिरुध्द कांबळे, अबूबकर लांडगे, प्रा.किरण खाजेकर, सोमनाथ शेळके, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब बनसोडे, गौरव चौधरी, सचिन कोंढरे पाटील, निर्मला खैरे, स्वाती शिंदे, प्रतिभा कांबळे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, मकरध्वज यादव, उमेश बनसोडे, विशाल कसबे, याकुब इनामदार, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, सतीश भोसले, वसंत वावरे, विजय ओव्हाळ, बबलू तामचिकर, तारिक रिजवी, गौतम ओव्हाळ, साजिद खान, भास्कर नारखेडे, पांडुरंग जगताप, गुंगा क्षीरसागर, अरुण साठे, सुरेश घोरपडे, आनंदा फडतरे, चंद्रशेखर हौन्शाळ, बसवराज शेट्टी, सोहन राम, रोहित कांबळे, गणेश बंदपट्टे, साहिल पवार, रवींद्र कांबळे, अभिजीत जाधव आदींसह सर्व आघाडी संघटना, विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.











































