तिथे विनंयभंगासारखे काही घडलेच नाही

0
182

पुणे, दि. १४ (पीसीबी) : मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गर्दी होती. तिथे पोलिसही होते. आव्हाड फक्त एका भगिनीला बाजुला करुन स्वत: पुढे निघुन गेले. तिथे विनयभंगासारखा कोणताही प्रकार घडला नाही. पण जाणीवपूर्वक लोक प्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळ आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाडांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अजित पवार म्हणाले की, कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे ज्या गाडीत बसले होते, तिथला जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या गाडीच्या डाव्या बाजुला तिथे एक पोलिस आफिसरही दिसतात. जितेंद्र आव्हाड एका महिलेला बाजूला करुन निघून गेले. मुख्यमंत्र्यांपासून पाच-दहा फुटांचचं अंतर असेल. तिथे विनयभंगाचा असा कोणताही प्रकार घडला नाही. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे
तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. कशाही प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री झाले असलात तरी राज्यातल्या साडेतेरा कोटी जनतेचं तुम्ही प्रतिनिधीत्व करत आहात. सत्ता येते जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेला नाही, जितेंद्र आव्हांडानी राजीनामा देऊ नये. प्रत्येकाने कायद्याचा संविधानाचा, जनतेचा आदर केला पाहिजे. पण जितेंद्र आव्हाडांनी कोणताही विनयभंग केलेला नाही. त्यांच्यावर असा गुन्हा लावण्याचं कोणतही कारण नव्हतं.