तारण ठेवलेला फ्लॅट विकून नागरिकाची 23 लाख रुपयांची फसवणूक

0
101

दिघी, दि. 2 ऑगस्ट (पीसीबी) – बँकेकडे तारण असलेला फ्लॅट पुन्हा विकत एका नागरिकाचे 23 लाख रुपयांची फसून करण्यात आली आहे ही फसवणूक 3 नोव्हेंबर 2020 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दिघी येथे घडली आहे.याप्रकरणी नितीन अर्जुनराव कोठारी (वय 45 रा. दिघी) यांनी दिली पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी हेमंत कुमार घनश्याम तिवारी (वय 40) अनिकेत घनश्याम तिवारी, कृष्णकुमार घनशाम तिवारी (वय 43) व दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी व्यावसायिक कारणासाठी त्यांचा फ्लॅट 2017 मध्ये बँकेकडे तारण म्हणून ठेवला होता. त्यावर त्यांनी बारा लाख रुपयांचे कर्ज काढले. मात्र हे माहीत असताना देखील त्यांनी त्याच फ्लॅटचे बनावट कागद बनवून फिर्यादी यांना तो फ्लॅट 23 लाख रुपयांना विकला. संबंधित फ्लॅटवर कर्ज असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून तिघी पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.