ताथवडे येथे मेडिकल दुकान फोडले

0
87

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) -ताथवडे येथे तीन चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडले. ही घटना गुरुवारी (दि. 8) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास तीन चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटले. दुकानाच्या गल्ल्यातून पाच हजार 500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी काढून नेली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.