ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याच्या प्रस्तावावर आज चर्चा

0
352

आग्रा, दि. ३१ (पीसीबी) : प्रेमाची अमर निशाणी म्हटला जाणारा ‘ताजमहाल’ सतत चर्चेत असतो. ताजमहालचं नाव बदलण्याचा विषय असो, ताजमहालमधील बंद खोलीचं रहस्य असो किंवा ताजमहालच्या आत भगवा परिधान करण्यावर बंदी असो. मात्र, आता ताजमहालशी संबंधित आणखी एक नवं प्रकरण जोडलं गेलंय.

भाजपचे ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड आज (बुधवार) महापालिकेच्या बैठकीत ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. नाव बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सभागृहात मांडण्यात आला आहे. ताजमहाल आपल्या नावामुळं सतत चर्चेत असतं. हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.

याच दरम्यान आता भारतीय जनता पक्षाचे ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड यांनीही ताजमहालचं नाव बदलण्यासाठी आवाज उठवला आहे. ताजमहालचं नाव बदलण्याबाबत त्यांच्याकडं अशी अनेक तथ्ये आहेत, ज्याच्या आधारावर त्यांनी सभागृहासमोर नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं नगरसेवक राठोड यांचं म्हणणं आहे. आज बैठक होईल तेव्हा सर्व पुरावेही सभागृहात सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आज दुपारी आग्रा महानगरपालिकेत सदनाला सुरुवात होणार असून, त्यात शहरातील सर्व नगरसेवक सहभागी होणार आहेत. यावेळी नगरसेवक शोभाराम राठोड ताजमहालचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत.